भीमराव..!
तृषार्तांची मिटविलीस प्यास..
भुकेल्या दिधला घास..
कोंडला ज्यांचा युगेयुगे श्वास..
त्यांचा बनलास अगाध विश्वास..!१!
करून दुबळ्यांचे नेतृत्व..
गाजविलेस अमोघ कर्तृत्व..
ब्रिटिशही झाले अचंबित..
असे तुझे स्वयंप्रकाशी व्यक्तित्व..!२!
बा भीमा,
माणुसकीचे दुसरे नाव...
कुणीही घ्यावे 'भीमराव '..!
जयंती तुझी चहुमुलखी..
आज भारतभर फक्त..
गाजतंय तुझंच नाव..!!३! !
#सिद्धार्थ #गोपाळ #तांबे
@ ९१५८४६३२९६
No comments:
Post a Comment
संदेश