रजिस्टर
क्रमांक
-सिंधुदुर्ग/0000006/2019
फुले-आंबेडकरी
युवाशक्तीचे
विचारशील
व कृतिशील
क्रांतीचक्र
प्रस्तावना:
स्वातंत्र्य, समता ,बंधुता ,न्याय आणि धर्मनिरपेक्षता ही भारतीय संविधानाने दिलेली लोकशाही दृष्टीत मानवी मूल्य संवर्धित करण्याच्या उद्देशाने या संस्थेची स्थापना करण्यात आली सदर संस्थेच्या माध्यमातून फुले-आंबेडकरी विचारधारा समाजातील सर्व स्तरापर्यंत पोहोचवून परिवर्तनवादी चळवळीचा नवा आदर्श सर्वांसमोर उभा करणे यासाठी संस्थेच्या वतीने सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक साहित्यिक आणि धम्मविषयक कृती कार्यक्रमांचे आयोजन करून येणाऱ्या काळा समोरील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी समाजाचे प्रबोधन करणे ही समाजाभिमुख ध्येये डोळ्यांपुढे ठेवून संस्थेची बांधणी करण्यात येत आहे.
उद्दिष्टे:
●
सामाजिक समता आणि सम्यक परिवर्तन हे प्रमुख उद्दिष्ट संस्थेचे राहिल.
●
लोकशाही दृष्टीत मानवी मूल्यांचे संवर्धन आणि संगोपन करणे.
●
सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक साहित्यिक आणि धम्मविषयक उपक्रमांद्वारे समाजातील सर्वस्तरीय बहुजन जनतेशी सुसंवाद घडवून आणणे.
●
आंबेडकरी विचारधारा प्रमाण मानून बहुजन समाजातील सर्व घटकांनी आणि परिवर्तनवादी समूहांना एकत्र आणून संस्थेच्या कार्यपद्धतीमध्ये व्यापक दृष्टिकोन निर्माण करणे.
●
प्रस्थापित समाज व्यवस्थेमध्ये सम्यक परिवर्तन घडवून आणण्यासाठी परस्पर सामंजस्य, प्रेम आणि विश्वास वृद्धिंगत करून त्यांना या विचारधारेशी जोडून घेण्याचा प्रवृत्त करणे
●
परिवर्तन चळवळीतील कार्यकर्ते, युवक, महिला आणि विद्यार्थी यांच्यामध्ये वैचारिक प्रगल्भता निर्माण करणे
●
संस्थेच्या ध्येयधोरण यांना अधिक व्यापकता निर्माण करण्यासाठी समविचारी सन,, संघटना चळवळी यांच्यामध्ये वैचारिक सुसंवाद घडवून आणणे.
●
संस्थेच्या ध्येयधोरणांची अथवा उद्दिष्टांशी विसंगत कोणतेही विचार प्रवाहाला परावृत्त करणे तसेच प्रस्थापित समाज व्यवस्थेचे समर्थन न करता आंबेडकरी विचारधारेचे परिवर्तनवादी विचार समाजात रुजविणे.
संस्थेची
कार्यपद्धती:
●
संस्थेचा कार्यकाल:
दोन
वर्षांचा
राहील.
●
संस्थेचे कार्यक्षेत्र :
सिंधुदुर्ग
जिल्हा
●
कार्यप्रणालीची प्रमुख अंगे :
❏
सामाजिक
❏
सांस्कृतिक
❏
शैक्षणिक
❏
साहित्यिक
❏
धर्मविषयक
विविध
उपक्रम:
●
सामाजिक
उपक्रम
❏
विविध सामाजिक विषयावर प्रमुख मार्गदर्शक, विचारवंतांची व्याख्याने, परिसंवाद,
चर्चासत्रे
आयोजित
करणे.
❏
सामाजिक समस्यांबाबत विचारविनिमय करुन ठळक कृती कार्यक्रमांची आखणी करणे.
उदा. अंधश्रद्धा निर्मूलन,
व्यसनाधीनता
कमी
करणे
प्रबोधन, बेरोजगार तरुणांसाठी शासन स्तरावरील विविध योजना,
लेक
वाचवा
अभियान, महिलांचे आरोग्य प्रबोधन,
रक्तदान
शिबिरे
, आरोग्य शिबिरे,
❏
आर्थिक दुर्बल घटकांसाठी शासकीय योजनांचा लाभ
❏
सामाजिक समता आणि समाजपरिवर्तन विषयक विविध उपक्रमांचे आयोजन करणे
❏
समाज प्रबोधन शिबिर
❏
कार्यकर्ता प्रबोधन शिबिर
❏
दर्पण प्रबोधिनी संवाद
●
सांस्कृतिक
उपक्रम
❏
आंबेडकरी जलसे
❏
जय भीम गायन पार्टी स्पर्धा
❏
पथनाट्य
❏
सामाजिक आशय व चळवळी वर आधारित क्रांतिकारी गीते
❏
सांस्कृतिक कार्यक्रम
●
शैक्षणिक उपक्रम
❏
विद्यार्थी अभ्यास वर्ग
❏
जय-भीम टॅलेंट सर्च
❏
विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्व निबंध चित्रकला अभिनय स्पर्धा
❏
विद्यार्थी व्यक्तिमत्व विकास शिबिर
❏
बाल ग्रंथालय
❏
बोरूची शाळा
❏
विद्यार्थी गुणगौरव
❏
युवकांसाठी करिअर मार्गदर्शन
❏
युवकांसाठी नोकरीच्या संधी/ व्यावसायिक मार्गदर्शन
❏
शैक्षणिक उपक्रमांतर्गत परिसंवाद/ चर्चासत्रे/ व्याख्याने
●
साहित्यिक
उपक्रम
❏
आंबेडकरी साहित्य आणि समाज विषयक चर्चासत्रे परिसंवाद, कविसंमेलनांचे आयोजन
❏
कवी उत्तम पवार स्मृति राज्यस्तरीय काव्य पुरस्कार
❏
विद्रोही कविता-
कार्यशाळा
❏
आंबेडकरी कवितांचे अभिवाचन
●
धम्मविषयक
उपक्रम :
❏
धम्म जागो अभियान
❏
बुद्ध आणि त्याचा धम्म -
ग्रंथाचे
सामुहिक
वाचन
❏
धर्मजागृती संदर्भात मार्गदर्शन
❏
धम्म शिबिर
❏
धम्म स्थळांना भेटी
वरील सर्व उपक्रमांच्या आयोजनासाठी खालील विभाग स्थापन करणे
❏
दर्पण महिला प्रबोधिनी
❏
दर्पण विद्यार्थी प्रबोधिनी
❏
दर्पण संस्कृती प्रबोधिनी
❏
दर्पण धम्म प्रबोधिनी
No comments:
Post a Comment
संदेश