दर्पण प्रबोधिनी सिंधुदुर्ग
रजि. क्र. सिंधुदुर्ग/००००००६/२०१९
*संक्षिप्त परिचय*
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जन्मशताब्दी वर्ष सन१९९० -१९९१ या वर्षात कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील बौद्घ व परिवर्तन विचारधारा जोपासणा-या युवापिढीने 'दर्पण सांस्कृतिक मंच कणकवली ' या नावाने संघटना स्थापन केली. या काळात कवी व विचारवंत उत्तम पवार यांच्या प्रेरणेतून ही संस्था २५ वर्षे 'मनोरंजनातून समाजप्रबोधन ' हे ब्रीद घेऊन कणकवली व परिसरातील बौद्घ समाजाची युवा पिढी व ग्रामीण जनतेत आंबेडकरी चळवळीचा विचार रूजविण्यासाठी ही युवा पिढी सक्रियपणे कार्यरत राहिली आहे. आनंद तांबे, सिद्धार्थ गो.तांबे , विद्याधर तांबे ,सुधीर तांबे, मिलिंद सर्पे ,सुनिल तांबे यासारख्या तरूणांनी विविध सांस्कृतिक उपक्रम राबवले. अंधश्रद्धानिर्मूलन, जादूचे प्रयोग, प्रबोधन गीते, शाहिरी जलसा, गटचर्चा, व्याख्यानमाला, परिसंवाद,धम्मपरिचय शिबीरे, 'दर्पणसंवाद ' वार्तापत्र यासारख्या उपक्रमांतून युवकांची फुले आंबेडकरी मनोभूमिका घडविणारी ही महाराष्ट्र राज्यातील महत्त्वाची दखलपात्र संस्था आहे. या संस्थेच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यातील विविध मान्यवर विचारवंतांची व्याख्याने कणकवली येथे झाली व प्रबोधन विचार अधिक सर्वदूर पसरला.
या काळात *दर्पण ..का? कशासाठी?*, *आंबेडकर जन्मशताब्दी वर्ष.. काय कमाने? काय गमावले ?* या विषयावर सलग परिसंवाद आयोजित करून त्यात डॉ. भालचंद्र मुणगेकर ( माजी कुलगुरू, मुंबई विद्यापीठ), दिवं. प्रा. गोपाळ दुखंडे (सिनेट सदस्य, मुंबई विद्यापीठ ) या मान्यवरांनी सहभाग नोंदवला.
सुमारे पंचवीस वर्षे सातत्याने संस्थेचे सामाजिक, सांस्कृतिक कार्य सुरू ठेऊन आंबेडकरी समाजासमोर चळवळीचा नवा चेहरा निर्माण केला, यामध्ये संस्थेचे संस्थापक अध्यक्ष उत्तम पवार यांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे
दर्पणच्या सन २०१५ या रौप्य महोत्सवी वर्षात संस्था एका महत्त्वपूर्ण टप्प्यावर येताना फुले आंबेडकर *दर्पण प्रबोधिनी ,सिंधुदुर्ग* असे नामाभिधान करण्याचे संस्थेच्या क्रियाशील कार्यकर्त्यांच्या विचारमंथनातून ठरले. आज मितीला संस्था शैक्षणिक व सांस्कृतिक तसेच सामाजिक क्षेत्रात महत्त्वाची भूमिका घेऊन सांस्कृतिक परिवर्तनाची लढाऊ सक्रीयपणे लढत आहे.. महाराष्ट्रातील नामवंत विचारवंत, आंबेडकरी चळवळीचे अनेक अभ्यासक, लेखक, कवी
यांना निमंत्रित करून कार्यकर्त्यांच्या वैचारिक प्रगल्भतेला आणि कृतिशीलतेला
प्रोत्साहन देण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील राहणारी अग्रगण्य संस्था म्हणून
राजस्तरापर्यंत संस्थेने आपला ठसा उमटविला, यामध्ये संस्थेचे निष्ठावंत पदाधिकारी,
कार्यकर्ते, हितचिंतक, नोकरदार सभासद, सदस्य यांनी दिलेले आर्थिक आणि सामाजिक
योगदान निश्चितच उल्लेखनीय आहे
सुमारे पंचवीस वर्षे सातत्याने संस्थेचे सामाजिक, सांस्कृतिक कार्य सुरू ठेऊन आंबेडकरी समाजासमोर चळवळीचा नवा चेहरा निर्माण केला, यामध्ये संस्थेचे संस्थापक अध्यक्ष उत्तम पवार यांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे
संस्थेचा हा सामाजिक प्रवास सुरू असतानाच सन
२०१६ साली संस्थेवर एक मोठा आघात झाला, संस्थेचे संस्थापक उत्तम पवार यांचे २२
जुलै २०१६ रोजी अपघाताने आकस्मिक निधन झाले आणि सारे कार्यकर्ते, सारा आंबेडकरी
समाजच दुःखाच्या खाईत लोटला गेला... क्षणभर सारे स्तंभित झाले, प्रत्येकाचा शोक
अनावर झाला... संस्थेमध्ये कधीही न भरून येणारी पोकळी निर्माण झाली, पण शेवटी
सृष्टीचा नियम हा प्रमाण मानावाच लागला, आता फार दिवस शोक करत बसून चालणार नाही,
तर स्मृतिशेष उत्तम पवार यांच्या कार्याची प्रेरणा घेऊन पुन्हा प्रत्येकजण सामाजिक
कार्यासाठी पुढे सरसावले, उत्तम पवार यांना अभिप्रेत असलेले संस्थेचे कार्य हाती
घ्यावे या उद्देशाने संस्थेचे सदस्य राजेश कदम यांनी मोठ्या धिराने संस्थेची धुरा
हाती घेतली. त्यांना संस्थेच्या सर्व कार्यकर्त्यांनी उत्तम
साथ दिली, त्यामुळे उत्तमोत्तम कार्यक्रम आयोजित करून उत्तम पवार यांना अभिप्रेत
असलेले सामाजिक, सांस्कृतिक, धम्मविषयक, युवाजागर अभियान, कार्यकर्ता प्रबोधन
शिबीर, महिला प्रबोधन शिबिर, असे अनेक समाजाभिमुख कार्यक्रम यशस्वीपणे राबविले. हे सारे करताना काही घटनात्मक पेच निर्माण होऊ
लागले, संस्था रजिस्टर नसल्यामुळे आणि संस्थेचे ऑडीट वेळोवेळी होत नसल्याने काही
संस्थात्मक अडचणी येताहेत हे लक्षात आल्यावर संस्थाध्यक्ष राजेश कदम आणि सर्व कार्यकारिणी
सदस्य यांच्या एकत्रित विचारातून संस्था रजिस्टर करण्याचे ठरविण्यात आले, यासाठी
संस्थेचे नाव बदलणे क्रमप्राप्त झाले, कारण आॅनलाईन रजिस्टर करताना विशिष्ट
घराण्याशी संबंधित नामविस्तार करताना पूर्व परवानगी घेणे अपेक्षित आहे, फुले
-आंबेडकर या राष्ट्रपुरूषांच्या नावाचा उल्लेख न करता *दर्पण प्रबोधिनी
सिंधुदुर्ग* असे संस्थेचे नाव देऊन
संस्था *१८ जानेवारी २०१९* रोजी रजिस्टर
करण्यात आली,
निखळ परिवर्तनाचा ध्यास घेत काम करणारे हे कार्यकर्ते नेहमीच आशावादी आहेत..
म्हणूनच म्हणावेसे वाटते..
*हे असे आहे तरी पण*
*हे असे असणार नाही..!*
*दिवस अमुची येत आहे*
*तो घरी बसणार नाही..!*
-शब्दांकन- प्रा. सिद्धार्थ गो. तांबे.
No comments:
Post a Comment
संदेश