मानवंदना जोतीरावांना
भयाण होता काळोख जेव्हा..
किर्र होती रात...
सापडत नव्हती वाट जेव्हा...
फणा काढून सर्पजात...
व्याधीवर या जालीम उपाय
निघालात तुम्ही हुडकत..
गोरगरिबांना हुलकावणारी
विद्या आली दुडकत..!
केला प्रहार काळाच्या माथी
अक्षरं झाली आपलीशी..!
जुळली मैत्रीची नाळ अशी की
शब्दच झाले वश बहुतांशी..!
मनसुब्यांचा सनातन्यांच्या
बिघडून गेला बिगूल..!
वंचित शोषित बोलता केलात
स्कंधी रूळतेय झूल..!
कोटी दिनांचे पिता झालात
माता सावित्री फुले..!
तुम्हामुळेच शानीसुरती
झाली बहुजनांची मुले..!
नित्य ऋणाईत तुमचे आम्ही
तुम्हां नित्य प्रणिपात..!
भारतवर्षी अखंड जागृत
विराजे थोर नाम जगतात.. !
राष्ट्रनिर्माणकर्त्या जोतीरावांच्या स्मृतींना विनम्र मानवंदना
कवी - प्रा. सिद्धार्थ तांबे (कणकवली)
No comments:
Post a Comment
संदेश