भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त दर्पण प्रबोधिनी सिंधुदुर्ग आणि कायद्याने वागा लोकचळवळ पुरस्कृत
*संविधान प्रास्ताविका*
जिल्हास्तरीय हस्ताक्षर स्पर्धा संपन्न /
जिल्ह्यातील प्राथमिक आणि माध्यमिक शाळेतील विद्यार्थीचा उत्स्फुर्त प्रतिसाद
इयत्ता ५वी ते ७वी (गट पहिला) इयत्ता ८वी ते १०वी (गट दुसरा)
या दोन्ही गटात मिळून तब्बल १४८६ स्पर्धकांचा उदंड सहभाग
भारतीय संविधान हे आपल्या लोकशाहीचे प्राणतत्व आहे.. भारतीय समाजाला लोकशाहीधिष्टित प्रजासत्ताक अधिकार प्राप्त करून देण्यासाठी संविधानाचे निर्माते डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान अनन्यसाधारण आहे.. संविधानाच्या रूपाने देशात स्वातंत्र्य, समता ,बंधुता आणि न्याय ही मूलतत्वे खऱ्या अर्थाने रूजवायची असतील तर ही शिकवण बालवयात विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबवायला हवीत... स्पर्धेच्या निमित्ताने का होईना विद्यार्थी संविधानाचा संकल्पपूर्वक निर्धार करून भविष्यात लोकशाही चिरंतन टिकविण्यासाठी प्रयत्नशील राहतील हा या स्पर्धेच्या आयोजनाचा मुख्य उद्देश आहे
संविधान प्रास्ताविका हस्ताक्षर स्पर्धेच्या निमित्ताने संविधानाच्या संकल्पाबरोबरच विद्यार्थ्यांना सुबक सुवाच्य आणि वळणदार सुलेखन करण्याचा सराव व्हावा.. कारण सुरेख अक्षर हा माणसाचा अलंकार आहे... अक्षरातून व्यक्तीचे अंतरंग प्रतिबिंबित होत असते... विद्यार्थी आपले व्यक्तिमत्त्व अक्षराप्रमाणे सुंदर करण्याचा निश्चितच प्रयत्न करतील असा विश्वास संस्थेचे अध्यक्ष राजेश कदम यांनी व्यक्त केला.
*संविधान प्रासाविका हस्ताक्षर स्पर्धेचा निकाल खालील प्रमाणे*
*पहिले दहा हस्ताक्षर विजेते*
*गट पहिला -(५वी ते ७ वी)*
१) दुर्वांकूर नामदेव घाडी - कुडाळ हायस्कूल, कुडाळ
२)तनया प्रवीण कदम -एस् एम् हायस्कूल, कणकवली
३)ओंकार संजय सदडेकर --शिवडाव हायस्कूल, कणकवली
४)जीवन प्रशांत गोसावी -एस् एल्. देसाई विद्या. पाट, कुडाळ
५)वैष्णवी राजेंद्र तवटे -विद्यामंदीर, कणकवली
६)धनश्री मिलिंद निकम -जि. प. शाळा वेंगुर्ला नं. २
७)साक्षी संदीप कांबळी -रेडी सुकळभाट शाळा, नं. २,वेंगुर्ला
८)काव्या सद्गुरू चव्हाण -विद्यामंदीर सोनाळी नं. १,वैभववाडी
९)चैतन्य तळवणेकर - केंद्रशाळा बांदा नं. १,सावंतवाडी
१०)मृणाली स्नेहलकुमार तांबे -भरणी, कणकवली
*गट दुसरा -८ वी ते १० वी*
१)प्रीती प्रकाश परब -शिवडाव हायस्कूल, कणकवली
२)गौतमी उदय घाडी -न्यू इंग्लिश स्कूल आचरा, मालवण
३)मितेश राजेश पाताडे -शिवडाव हायस्कूल, कणकवली
४)सलोनी संतोष पवार -अ. रा. विद्यालय, वैभववाडी
५)विघ्नेश विलास साळगावकर - आरोंदा हायस्कूल, सावंतवाडी
६)दिया प्रसाद कुबल -कुडाळ हायस्कूल, कुडाळ
७)किरण दिनेश मणचेकर -माध्यमिक विद्या. साळशी, देवगड
८)श्रावणी भिवा पास्ते -कलंबिस्त इंग्लिश स्कूल, सावंतवाडी
९)अथर्व अजित केरकर -न्यू इंग्लिश स्कूल, उभादांडा, वेंगुर्ला
१०)विघ्नेश शामसुंदर वारंग - नुतन विद्यालय, इन्सुली, सावंतवाडी
अशा प्रत्येकी दोन गटातून दहा सर्वोत्कृष्ट हस्ताक्षर विजेते निवडण्यात आले, तसेच ५० निवडक हस्ताक्षर विजेत्यांना निवडण्यात येणार असून पहिल्या दहा विजेत्यांना संस्थेच्या वतीने रोख पारितोषिके, सन्मानपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे, निवडक ५०हस्ताक्षर विजेत्यांना सन्मानपत्र देण्यात येणार असल्याचे अध्यक्ष राजेश कदम यांनी सांगितले.
स्पर्धेचे नियोजन संस्थेचे कार्यवाह आनंद तांबे, उपाध्यक्ष अनिल तांबे, महेंद्र कदम, खजिनदार नेहा कदम यांनी केले, तसेच संस्थेचे सर्व सल्लागार, सदस्य यांनी सहकार्य केले, कायद्याने वागा लोकचळवळीचे राज्य प्रणेते राज असरोंडकर यांनी मार्गदर्शन केले.स्पर्धेचे परिक्षण हस्ताक्षर तज्ज्ञ सुनिल कदम आणि जी. व्ही कदम यांनी केले तर संपूर्ण स्पर्धेचे व्यवस्थापन स्पर्धा प्रमुख विशाल हडकर यांनी केले
हस्ताक्षर स्पर्धेच्या उत्कृष्ट नियोजनाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे
https://m.facebook.com/story.php?story_fbid=161044765315564&id=108388377247870

No comments:
Post a Comment
संदेश